अमरावती : जिल्ह्य़ात कोरोना संक्रमणाचा कालावधी दिवसेंदिवस वाढत चालला असून सातत्याने कोरोनो पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या देखिल झपाट्याने वाढत आहे. २८ जानेवारी रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ७८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून २१ हजार ५१७ रुग्ण आतापर्यत कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ४00 च्या जवळपास रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून २0 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्य़ात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकसुध्दा त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसापासून जिल्हयात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली ही जिल्हावासीयांसाठी शुभवार्ता असली तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सातत्याने वाढत असलेली संख्या ही नागरिकांसाठी चिंतनिय बाब आहे.प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून सातत्याने उल्लंधन होत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. २८ जानेवारी रोजी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसर जिल्ह्य़ात पुन्हा ७८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून परिणामी जिल्ह्य़ात २१ हजार ५१७ कोरोनाग्रस्त दिसून येत आहे. ४१४ रुग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला असून २0 हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Related Stories
September 14, 2024
September 8, 2024