अमरावती : जिल्हयात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून एकाच दिवशी तब्बल ३६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्य़ात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. ३६९ रुग्णासह जिल्ह्य़ात आतापर्यत २४ हजार ५१९ कोरोनाग्रस्त आढळून आले असून ४३१रूग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला आहे. २३ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असून ९९४ रुग्णांनावर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे.
जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या रूग्णसंख्येवर वारंवर प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तर प्रशासनाने आखुन दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटोकर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे. मात्र तरीही बाजारपेठा, लग्न समारंभ, राजकीय सभा, बैठका यासह इतर ठिकाणी नागरिकांकडून प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे सर्रास होत असलेले उल्लंधन हे कोरोना रूग्णांच्या वाढत्या उच्चाकाला पाठबळ देणारे ठरले. देशासह राज्यात पूर्वी प्रमाणे परीस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी कोरोनाच्या केंद्रस्थानी असलेला मनुष्य हा मात्र या भयावह वास्तव्यापासून अद्यापही अनभिग्नच असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.विशेष म्हणजे कोरोना रुग्णांसोबतच जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये देखिल झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.१२ फेब्रुवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ३६९ रूग्ण हे नविन कोरोनाग्रस्त म्हणुन आढळुन आले आहेत. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत २४ हजार ५१९ रूग्णांना कोरोनाची लागन झाली आहे. २३ हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन ९९४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Related Stories
December 2, 2023