अमरावती : विद्यार्धी गुणवत्ता विकास मंचा तर्फे विद्यार्थी तथा शिक्षकांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते
आतापर्यत विद्यार्धी विकास मंचा तर्फे राज्यस्तरीय बडबडगीत स्पर्धा काव्य स्पर्धा महाराष्ट्र ज्ञानसखी पुरस्कार माझा वर्ग माझा उपक्रम स्पर्धा राबविण्यात आल्या ३जानेवारी बालिकादिन तथा महीला शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीची लेक व महाष्ट्राची सावित्री पुरस्काराचे माझे कार्य माझा सन्मान या स्पर्धे अंतर्गत त्यांच्या कार्याचे आॅनलाईन व्हिडीओच्या स्वरूपात प्रस्ताव मागविण्यात आले होते तसेच या व्हिडीओत सर्वाधिक views व like मिळविणार्या शिक्षिकेला महाराष्ट्राची सावित्री पुरस्कार, पुरस्कार देवून आँनलाईन गौरव करण्यात आला या उपक्रमात महाराष्ट्रातील २१ सावित्रीच्या लेकींनी सहभाग घेतला ज्यामध्ये आशा कोवे यवतमाळ, वसुधा नाईक पुणे, निलम सुंबे औरंगाबाद, रूपाली शिंदे पुणे, कविता माने कोल्हापूर, वैशाली गावंडे यवतमाळ, संजिवनी बामणे सातारा करूणा मोहीते सांगली, चित्रा गोतमारे यवतमाळ, कविता सव्वालाखे यवतमाळ, पूनम ननावरे पुणे, लता पाटील उस्मानाबाद, रेशमा पटवेेगार कोल्हापूर, शोभा नलाबले नांदेड, सुनिता गेडाम यवतमाळ, सरिता पाटसकर पुणे, सविता कदम नांदेड, सुरेखा ठाकरे यवतमाळ, कल्पना दुल्लरवार यवतमाळ, सिमा नेरकर भिवंडी ठाणे, मनिषा गावडे कोल्हापूर, या सर्वं उपक्रमशिल शिक्षिकांचा सावित्रीची लेक पुरस्काराने प्रमाणपत्र देवून आॅनलाईन सन्मान करण्यात आला तसेच ४०५९ views & like मिळविणार्या जिप शाळा सोंडेमाथना पंस वेल्हे जि पुणे येथील उपक्रमशिक्षिका सरिता विजय पाटसकर हिला महाराष्ट्राची सावित्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच या सर्व उप्रकम शिक्षिकांचे आॅनलाईन कविसंमेलन घेण्यात आले यामध्ये पूनम ननावरे वैशाली मेमाणे चित्रा गोतमारे कल्पना दुल्लरवार सरितापाटसकर कविता सव्वालाखे वैशाली गावंडे प्रा रेखा फाले राजश्री नलावडे अमित ईखार सुरेखाठाकरे मिनल भारती सविता कदमसुवर्णा नरवडे रेशमा पटवेगार यांनी सावित्रीच्या जिवनावर कविता सादर केल्या या उपक्रमाला महाष्ट्रातील ऊस्फुर्त प्रतिसाद मिळाला त्याबदल स्पर्धेचे संयोजक देवराव चव्हाण व महादेव निमकर यांनी समाधान व्यक्त केले पुढील काळात विद्यार्थ्याच्या व शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी अशाच प्रकारच्या स्पर्धा राबविण्यात येईल असे स्पर्धकांच्या संयोजकांनी सांगीतले
Contents
hide
Related Stories
November 14, 2024
November 11, 2024