मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच रिंकने सर्वांची मने जिंकली. आताच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट वर्कआउटनंतरचा आहे. तिच्या या फोटोमध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळत आहे.
रिंकुने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊटचा फोटो शेअर केला आहे. नेहमी जाड दिसणारी आर्ची शेअर केलेल्या फोटोत फिटनेसमध्ये दिसत आहे. रिंकूने तब्बल २0 किलो वजन घटविले आहे. विशेष म्हणजे तिने वजन घटविण्यासाठी कोणताही ट्रेनर ठेवला नाही. तिची ट्रेनर व डाएटिशियन म्हणून तिच्या आईनेच पाहिले. तिच्या आईनेच तिच्या खाण्यापिण्याची आणि तिच्या व्यायामाची काळजी घेतली. केवळ दोन महिन्यांत तिने तब्बल वीस किलो वजन घटवल्याचे रिंकूने म्हटले आहे. रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.
तसेच, तिचा अँमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023