Skip to contentसूर्य जगवतो । सूर्य पेटवतो ।
सूर्य मिटवतो । तिमिरास ।।
रवी,दिनकर । नाम शोभे फार ।
विश्वाला आधार । त्याच्यामुळे ।।
नाही घेत काही । सदा देत राही ।
अंग लाही-लाही । तोच करी ।।
आपल्या कर्मास । सूर्य प्रामाणिक ।
आहे सर्वाधिक । महत्वाचा ।।
नाही दिसणार । कधीच प्रकाश ।
सृष्टीत तिमिर । सर्वत्र दिसेल ।
जीवन संपेल । क्षणार्धात ।।
सूर्य आहे देव । सूर्य तारणारा ।
स्वार्थ त्यागणारा । तोच खरा ।।
सूर्यनमस्कार । कर प्रातःकाळी ।
लावूनी कपाळी । माती वेड्या ।।
अजु हेची आहे । सकाळचे कर्म ।
पाळुनीया धर्म । जग सदा ।।
तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
Post Views: 42
Like this:
Like Loading...