वर्धा : मद्यधुंद जावयाने ६४ वर्षीय वृद्ध सासूला जबरदस्ती दारू पाजून बळजबरी अत्याचार केल्याची घटना आर्वी शहरात घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली असून या लज्जास्पद घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. वृद्धेची मुलगी आणि पती सचिन यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता. त्यामुळे वृद्धेची मुलगी नागपूर येथे तिच्या मोठय़ा वडिलांकडे गेली होती. याचाच फायदा घेऊन जावई सचिन हा घरी आला त्याने वृद्धेच्या मुलाला पनीर आणण्यासाठी बाहेर पाठविले. घरी कुणी नसल्याचे पाहून जावयी सचिनने वृद्ध सासूला जबरदस्ती दारू पाजली. सासूने दारू पिण्यास नकार दिल्यावरही सचिनने जबरदस्ती दारू पाजली. काही वेळानंतर मुलगा पनीर घेवून घरी आला. जावयी सचिनने स्वत:च्या हाताने पनीरची भाजी बनविली. त्यानंतर दोघांनी जेवण केले. सचिनने वृद्ध सासूच्या मुलाला पुन्हा खर्रा आणण्यासाठी बाहेर पाठविले. मुलागा घराबाहेर पडताच सचिनने वृद्ध सासूवर बळजबरी अत्याचार केला. मुलगा खर्रा घेऊन आल्यावर सचिनने खर्रा घेवून निघून गेला. वृद्ध सासूने ही बाब दुसर्या दिवशी तिच्या मुलाला सांगितली. तसेच नागपूर येथे गेलेल्या तिच्या मुलीला दुरध्वनीवरून संपर्क करून सांगितली.
त्यानंतर वृद्ध सासूने याप्रकरणी आर्वी पोलिसांत धाव घेत जावयी सचिन वरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून ३७६, ३७६ (२),(एन) या भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
यापूवीर्ही केला होता अत्याचार
सचिन आणि वृद्धेच्या मुलीचा २0१२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. जावई सचिन हा सेंट्रींगचे काम करायचा. मात्र, दोघांमध्ये नेहमीच घरगुती कारणातून वाद व्हायचे. यापूर्वीही मुलगी बाहेरगावी गेली असता डिसेंबर २0१९ मध्ये जावई सचिन याने घरात प्रवेश करून वृद्ध सासूवर बळजबरी अत्याचार केला होता.
मात्र, बदनामी खातर वृद्धेने ही बाब कुणालाही सांगितली नव्हती. मात्र, पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने वृद्धने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Related Stories
November 30, 2023
November 28, 2023