मुंबई :मजूर कामगार गरिबांना आर्थिक न्याय देणारा, सामाजिक आणि आर्थिक समतेकडे भारताचे अर्थचक्र अग्रेसित करणारा आणि कृषीक्षेत्राला नवसंजीवनी देणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दिली. सर्व समाज घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प देशाला दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन रामदास आठवले यांनी केले आहे.
जगातील दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा मोठा आपला देश आहे. या प्रचंड लोकसंख्येचा जीव कोरोनाच्या संकटात होता. त्या सर्वांना जीवदान देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले, असे रामदास आठवले यांनी सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, कामगार, दलित, अल्पसंख्यांक अशा सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याच्या महत्वपूर्ण विचारांचे सूत्र प्रकषार्ने दिसत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात सर्वांचा जीव वाचविण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय झाला.
दूरदृष्टी असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्य गरीब आणि दलित मागासवर्गीय वगार्चे होत लक्षात घेऊन अत्यंत चांगला आणि आर्थिक बळ देणारा, आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प सादर केला आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. याचबरोबर, आता यंदाच्या क्रांतिकारी अर्थसंकल्पातून सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय दिला जाणार आहे. शेतकर्यांना आणि मजुरांना कामगारांना तर या अर्थसंकल्पातून नवसंजीवनी देण्यात आली असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
Related Stories
November 30, 2023
November 28, 2023