- मावळ्याच्या पोरामधूनी
- महान पराक्रमी शिवबा घडला.
- गर्जना करून स्वराज्याची
- मुगल बादशाह हादरून गेला……
- पहाडाच्या छातीवर बसूनी
- गडकिल्ले सर केला.
- नव्या गनिमीकाव्याने
- लढाईचं तंत्र बदलला…..
- कुळवाडीभुषण होऊनी
- फितुर भटपंड्याचा कोंदा काढला.
- वार करणाऱ्या कृष्णाजीला
- तलवारीने क्षणात गारद केला.
- जीजाईच्या स्वप्नामधला
- नवं महाराष्ट्र निर्माण केला.
- सकल रयतेच्या कल्याणासाठी
- नवं संहिता तयार केला…
- गर्जतो रव सह्याद्रीत
- शिवबाच्या लढवय्य क्रांतीचा.
- अठरापगड जात बांधवाना
- प्रकाश दिला लढवय्य तेजाचा…
- -संदीप गायकवाड
- नागपूर
- ९६३७३५७४००