अमरावती : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२२ व्या जयंती उत्सवानिमित्त रविवार दि.२७ डिसेंबरला श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण युट्युबवर शिवाजी डॉट लाईव्ह या लिंकद्वारे करण्यात येणार आहे.संस्थेच्या वतीने होणारा जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात सर्वांना ऑनलाईन सहभागी होत येणार असून लाईव्ह चाटद्वारे भाऊसाहेबांना आदरांजली अर्पण करता येईल. दि.२७ डिसेंबरला सकाळी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती केंद्र, शिवाजी नगर येथे भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आदरांजली व अभिवादन करण्यात येईल. सकाळी ११ वाजता संस्थेच्या सभागृहात मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात संस्थेच्या युट्युब वाहिनीचा शुभारंभ, दैनंदिनी आणि शिवसंस्था या त्रेमासिकाच्या जयंती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येईल. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख जयंतीनिमित्ताने थेट संवाद साधतील.कोरोनामुळे शासनाच्या विविध निदेर्शाचे पालन करून यावर्षी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले नसले तरी आयोजित कार्यक्रमांमध्ये जनतेला सहभागी होता यावे म्हणून २७ तारखेला सकाळी ८ वाजतापासून शिवाजी डॉट लाईव्ह या युट्युब वाहिनीवर सर्व जनतेला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत येईल व भाऊसाहेबांना अभिवादन करून आदरांजली अर्पण करता येईल. सर्व नागरिकांनी शिवाजी डॉट लाईव्ह या युट्युब वाहिनीच्या माध्यमाने जयंती उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांनी केले आहे.
Related Stories
December 7, 2023