अमरावती : सोमवार दिनांक ६ डिसेंबर,२0२१ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अमरावती महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्य महापौर चेतन गावंडे यांचे शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य बुध्दवंदना घेण्यात आली.
उपरोक्त कार्यक्रमानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, सभागृह नेता तुषार भारतीय, विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, गटनेता डॉ.राजेंद्र तायडे, गटनेता चेतन पवार, शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे, नगरसेवक विलास इंगोले, प्रकाश बनसोड, विजय वानखडे, नगरसेविका संध्या टिकले, राधा कुरील, सोनाली नाईक, वंदना कंगाले, शोभा शिंदे, वंदना हरणे, जयश्री कु-हेकर, उपआयुक्त नरेंद्र वानखडे, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे यांचे हस्ते हारार्पण करण्यात आले. यावेळी भंते राजरत्न बोधी, राजु कुरील, सचिन नाईक, तांत्रिक सल्लागार जिवन सदार, नगरसचिव मदन तांबेकर, विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.