अमरावती : दारव्हा पंस मध्ये कार्यरत शिक्षक देवराव चव्हाण व महादेव निमकर यांनी विद्यार्थी विकास मंच हाँटसअप ग्रुपची निर्मिती केली या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकाच्या आतापर्यत विविध स्पर्धा राबविण्यात आल्या या स्पर्धेचा एक भाग म्हणून राज्यस्तरीय माझा वर्ग माझा उपक्रम स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले यामध्यें राज्यभरातून शाळांना आपले विविध उपक्रम सादर केले ज्या मध्ये भुईमुंगाच्या शेंगापासून गणितासह कार्यानुभवाचे उपक्रम सादर केले तर रांगोळीच्या माध्यमातून लोहारा येथील शाळेने विज्ञानविषयक जाणिवजागृती केली यामध्ये प्रथम क्रमांक
वैशाली मेमाणेजिप शाळा माळेवाडी जि.पुणे व रेशमा पटवेगारजिप शाळा कोगील खुर्द जि.कोल्हापुर यांना विभागून देण्यात आला तर द्वितीय क्रमांक पुनम ननावरे जिप शाळा मोटेवाडी जि. पुणे व चंद्रकांत तोळमारे जिप शाळा सारोळा जि. लातूर यांना विभागून देण्यात आला तर अश्विनी माळवे जिप शाळा लोहारा जि.यवतमाळ व ओंकार राठोड जिप शाळा जांभोरा जि यवतमाळ यांना विभागून देण्यात आला तर चतुर्थ क्रमांक जि.प शाळा सकनूर जि.नांदेड यांना देण्यात आला आहे तर सहभागी स्पर्धेकांमध्ये सुरेश बाहेकर जिप शाळा रामनगर। अमित इखार जिप शाळा पारधीपोड संगिता पाटील चिंतामण देशमुख प्राथमिक शाळा बिबवेवाडी अभय इंगळे जिप शाळा सायतखर्डा प्रमोदिनी जाधव जिप शाळा सारोळा या शाळांनी स्पर्धेत आपलें उपक्रम सादर केले तर यामध्ये गुगलमिटवर बालगीत व बडबडगीत रचनाकार ओंकार राठोड सर यांचा बडबडगीताचा कार्यक्रम घेण्यात आला
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी व गुणवत्तेसाठी आगामी काळात अशाच स्पर्धा राबविण्यात येईल असे स्पर्धेचे संयोजक देवराव चव्हाण व महादेव निमकर यांनी कळविले आहे
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023