अचलपूर : विदर्भ मिल चौकामध्ये दुपारी सव्वाचार दरम्यान एका वेडसर युवकाने अनेकांना चाकू दाखवित परीसरामधे दहशत पसरविण्यायाचा प्रयत्न केला होता. दैव बलवत्तर म्हणून वेडसर युवकाचा चाकू कुणालाही लागला नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेली असती . विदर्भ मिल परिसरातील एका चहाच्या टपरीवर सदर घटना झालेली आहे . सदर वेडसर इसम हा येथीलच निवार्या मध्ये वास्तव्य करत असल्याचे काही लोकांचे म्हणणे होते. तर येथील एका युवकाला सदर वेडसर व्यक्तीने पैसे मागण्याचा प्रयत्न केला होता सदर युवकाने नकार देताच त्याच्यावर वेडसर युवकाने चाकू काढीत त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला मात्र तेथील युवकांच्या प्रसंगावधानाने वेडसर युवकाच्या हातातील कटर व चाकू त्याच्याकडून हिसकावून घेतला व बघताच तिचे नागरिकांनी या दहशत पसरविणार्याला चांगलाच चोप दिला . व त्याला ताबडतोब ही जागा सोडून देण्यास सांगण्यात आले सदर वेडसर युवकाला काही दूरपयर्ंत काहींनी सोडून दिल्याची माहीती आहे.घटनास्थळाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती मात्र पोलिस आल्यानंतर तिथे आरोपी आढळून आलेला नव्हता . विशेष म्हणजे दोन दिवस आधी विदर्भ मिल चौकातील अंड्याच्या ठेल्याची बातमीसुद्धा प्रसारमाध्यमांनी प्रसारित केली होती व येथे अनेकांवर महिला मुलींवर शेरेबाजी होत असल्याचे सांगितले तर आज एका युवकाने येथे अनेकांना चाकूने धाक दाखवून एकाला जखमी करण्याचा प्रयत्न केल्याने विदर्भ मील चौकामध्ये पोलिसांच्या नियंत्रणाची आवश्यकता असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे .तसेच वाद होणार्या ठेल्यांच्या जागांवर कार्यवाहीची आवश्यकता आहे .
Related Stories
December 2, 2023