नवी दिल्ली : नव्या वर्षात भारतात दोन लसींना परवानगी मिळाली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानावर जोर दिला. भारतात लवकरच करोना लसीकरण सुरू होत आहे. आम्हाला देशातील वैज्ञानिकांचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद््घाटन समारंभात बोलताना मोदींनी वस्तू व सेवांच्या गुणवत्तेवर भर देण्याचे आवाहन केले.
यावेळी मोदींनी व्होकल फॉर लोकलचा नारा देत भारतीय वस्तू जगातील बाजारापयर्ंत नेण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत पंतप्रधानांनी नवे परिमाण निश्चित करण्याचे आवाहन केले . पंतप्रधानांनी राष्ट्रीय हवामान परिषदेबरोबरच राष्ट्रीय पर्यावरणीय गुणवत्ता प्रयोगशाळेचे भूमिपूजन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, देशात लवकरच करोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. देशातील सेवा गुणवत्तापूर्ण असायला हव्यात. मग ते क्षेत्र सरकारी असो वा खासगी. वस्तू दजेर्दार हव्यात. आपली गुणवत्ता परिमाण हे निश्चित करणार आहे की, भारतीय बनावटीच्या वस्तूंची जगात किती मागणी वाढली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात भारत आज जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने जात आहे. पण, हवेची गुणवत्ता आणि कार्बन उत्सर्जन मोजण्याच्या साधनांसाठी आपल्याला दुसर्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. यातही आत्मनिर्भर होण्यासाठी आपणे मोठे पाऊल टाकले आहे, असे मोदी म्हणाले. २0४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठीचे संकल्प लक्षात घेऊन पुढे जावे लागणार आहे. २0२0 मध्ये देस स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत आहे. त्यासाठी नवीन उद्दिष्ट, नवीन परिमाणं, नवी उंची गाठण्याच्या दिशेने पावले टाकावी लागणार आहेत. सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी संवाद करावा.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023