मुंबई : देशातील लोकांचय मनात लोकशाहीचा विचार रुजला असून याविरुद्ध वागणार्या कुठल्याही शक्तीला देशातील जनतेने सोडले नाही, त्यांना धडा शिकवला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. देशातील एकूण राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही सूचक विधानेही केली आहेत.
आणीबाणीच्या काळात देशातील लोकशाहीच्या बाजूने भूमिका घेणार्या हजारो लोकांना अटक करण्यात आली. यामुळे एक अजब स्थिती देशासमोर उभी राहिली. देशातील जनेच्या मनात लोकशाहीबाबत र्शद्धा आहे. त्यामुळे आणीबाणीनंतर लोकांना संधी मिळाली तर त्यांनी लोकशाहीविरोधात वागणारी कोणतीही शक्ती असो त्यांना धडा शिकवल्याचे शरद पवार म्हणाले. इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवले. कारण लोकशाहीविरोधात छेडछाडी करण्याची त्यांची तयारी नव्हती, असेही ते म्हणाले.
जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून समाजवादी विचारांची शक्ती समोर आली. त्यानंतर या विचारांवर चालणारे लाखो लोक पुढील अनेक वर्षात तयार झाले. देशाच्या हितासाठी त्यांनी काम केले. दरम्यान, समाजवादी विचाराच्या कामगार संघटनाही देशभरात निर्माण झाल्या, अशा शब्दांत पवार यांनी समाजवादी विचारांचा पुरस्कार केला.
Contents
hide
Related Stories
November 7, 2024
November 4, 2024
November 2, 2024