अमरावती : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोककला आणि पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची निवडसूची तयार करण्यासाठी जिल्हयातील संबंधित संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचा नमुना तसेच माहिती www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज भरून जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, डॉ. काळे यांच्या हॉस्पिटलसमोर, आदर्श शाळेशेजारी, खापर्डे बगिचा, अमरावती या पत्त्यावर 21 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोककला/पथनाट्याव्दारे माहिती देणाऱ्या उदाहरणार्थ गण गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी,भारूड आदी लोककला/पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे.याबाबत या क्षेत्रातील अनुभवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करणाऱ्या लोककला संस्था आणि पथकला संस्थांकडे विविध विषयावर (शासकीय योजनासह ) कार्यक्रम, पथनाटय करण्याचा अनुभव असावा, पथक किमान दहा जणांचे असावे. त्यामध्ये स्त्री-पुरूष, वादक यांचा समावेश असावा, लोककला/पथनाट्य पथक ज्या जिल्हयातील असेल त्याच जिल्हयातून अर्ज दाखल करावा, केंद्र सरकारच्या गीत आणि नाटय विभागाकडे संस्था नोंदणीकृत असल्यास प्राधान्य दिले जाईल,संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024