नवी दिल्ली : देशात गेल्यावर्षी केलेल्या टाळेबंदीने किती जणांचा बळी गेला, नोकर्या गेल्या, किती विस्थापित झाले याची मोजदादही करणे अशक्य असले तरी भयानक चित्र समोर आले आहे. देशातील अब्जाधीशांना टाळेबंदी बंदीत चांदी करून देणारी ठरली आहे. कोरोना व्हायरसने भारतातील अब्जाधीश आणि कोट्यवधी बेरोजगार, अकुशल कामगार, गरीब, पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील उत्पन्नाने आणखी दरी रुंद केली आहे. नॉन प्रॉफिट ग्रुप असणार्या ऑक्सफॅमने सोमवारी आपल्या अहवाल संबंधित आकडेवारी सादर केली.
असमानतेचा विषाणू नावाच्या अहवालात म्हटले आहे की कोरोना व्हायरस लॉकडाऊनदरम्यान भारताच्या अब्जाधीशांची संपत्तीत तब्बल ३५ टक्कयांनी वाढली आहे, तर देशातील ८४ टक्के कुटुंबांना आर्थिक अडचणीतून जावे लागले. त्याचवेळी, केवळ एप्रिल २0२0 मध्ये दर तासाला १७ लाख नोकर्या गेल्या. मार्च २0२0 पासून भारताच्या १00 अब्जाधीशांनी निर्माण केलेल्या संपत्तीमधून देशातील गरीब असलेल्या १३ कोटी लोकांना ९४ हजार ४५ रुपयांचा चेक दिला जाऊ शकतो. अहवालात म्हटले आहे की, भारतात वाढती असमानता कडवट आहे. साथीच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी एका तासात जेवढी संपत्ती निर्माण केली आहे त्यामध्ये भारतातील एका अकुशल कामगाराला कमावण्यासाठी १0 हजार वर्षे लागतील. तसेच त्यांनी जी सेकंदामध्ये केली आहे ती करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मुकेश अंबानी जगातील चौथा श्रीमंत व्यक्ती ठरले होते. अचानक लॉकडाऊनानंतर लाखो स्थलांतरित कामगारांना रोजगार, बचत आणि निवारा गमावला आणि त्यांना आपल्या गावात परत जाण्यास भाग पाडले गेले. त्यावेळी आपण शेकडो किलोमीटर चालत्या कामगारांना पाहिले तेव्हा वेदनादायक चित्रे समोर आली होती.
Related Stories
October 9, 2024