मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग करोना विषाणूशी लढा देत आहे. यामध्येच आता कोविड १९ विषाणूशी संबंधित असलेला विषाणूचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाउन करण्यात आला आहे. याच लॉकडाउनचा फटका अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला बसला आहे.
सैराट या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या लंडनमध्ये असून तिच्या आगामी छुमंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र, याच काळात लंडनमध्ये लॉकडाउन घेतल्यामुळे रिंकुसह संपूर्ण चित्रपटाची टीम लंडनमध्ये अडकल्याचं सांगण्यात येत आहे.
छुमंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत असून या चित्रपटात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळेदेखील आहेत. गेल्या १ महिन्यापासून या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरू होते.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023