अमरावती : लग्न समारंभात ५0 उपस्थितांची र्मयादा असतानाही त्याहून अधिक गर्दी आढळल्यास लॉनचालकांवर कारवाई करण्याची धडक कार्यवाही महानगर पालिकेकडून सुरु करण्यात आली आहे. लाली लॉन २ लाख ५0 हजार रुपये, व्हाईट हाऊस २ लाख ५0 हजार रुपये, कल्पदिप मंगल कार्यालय १ लाख रुपयाची दंडात्मक नोटीस देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत र्मयादित संख्येचे व गर्दी टाळण्याचे निकष न पाळणा्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या निदेर्शावरुन धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. र्मयादेहून अधिक व्यक्ती असलेल्या समारंभात प्रतिव्यक्ती ५00 रुपये दंड आकारण्यात येत आहे. लाली लॉन, व्हाईट हाऊस लॉन, कल्पदिप मंगल कार्यालय येथेही मोठी गर्दी आढळून आल्याने या लॉनचालकांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे. दंडात्मक नोटीस देण्यात आल्याचे महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाने अशी माहिती दिली आहे.
Related Stories
December 7, 2023