मुंबई : धूमधडाका चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोब काम केलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता मदतीसाठी त्यांनी मंदिराबाहेर मदत जमवण्याचे काम सुरू केले आहे. औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागावा, यासाठी त्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर निधी जमा करत आहेत. धूमधडाका चित्रपटात अशोक सराफ यांची नायिका म्हणून ऐश्वर्या राणे यांनी काम केलं होतं.
त्या म्हणाल्या, राज्य सरकारकडे वारंवार मदत मागण्याची माझी इच्छा नाही. पण त्यांनी माझी अवस्था पाहून मदत करणे आवश्यक आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, त्या मुंबादेवी, महालक्ष्मी, शिर्डी अशा विविध मंदिरांबाहेर जाऊन आर्थिक मदत जमा करणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात रामदास आठवलेंनी दिला आर्शय ऐश्वर्या राणे या सिंधुदुर्गमधील आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्या गावी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. या प्रवासात त्यांचे कपडे, साहित्य चोरीला गेले होते. त्यावेळी रामदास आठवलेंनी ऐश्वर्या यांना त्यांच्या घरात आर्शय दिला होता. यासंदर्भात फेसबुकवर हेमंत रानपिसे यांनी २ मे २0२0 रोजी एक पोस्ट लिहून त्यांचे काही फोटो पोस्ट केले होते. एका अपघाताने आयुष्य बिघडलं हिंदी चित्रपट ‘र्मद’ शूटिंगवेळी ऐश्वर्या यांचा अपघात झाला होता. घोडेस्वारी करताना त्या खाली पडल्या आणि त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. ऐश्वर्या यांनी आपले घर, दागिने, पैसे उपचारासाठी वापरले.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024