मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करा, आवश्यक तेथे प्रतिबंधक क्षेत्र तयार करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत वाढता कोरोना, रुग्णसंख्या, मृत्यूदर यांसह इतर गोष्टींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.
लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निबंर्धांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील, तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक आणि आवश्यक कारवाई केलीच पाहिजे. कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टागेर्टेड पद्धतीने तपासण्या करा. एकेका रुग्णांचे किमान २0 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. सर्व काही व्यवहार सुरु झाले आहेत. निबर्ंध शिथिल केले आहेत. त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत. परिणामत: आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024