अमरावती : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत पाठविता येतील.
या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2020 ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. मराठी वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांसाठी कार्यरत दिल्लीतील पत्रकारांच्या प्रवेशिका महाराष्ट्र परिचय केंद्र, ए-8,स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबा खडकसिंह मार्ग, नवी दिल्ली-11001.’ या पत्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमध्ये स्वीकारल्या जातील. याशिवाय ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32’ या पत्यावर थेट प्रवेशिका पाठविता येतील.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023