अमरावती : शहरी विकासाच्या प्रवाहात नागरिक केंद्रित धोरण आणि जनसामान्यांच्या अपेक्षांचा मागोवा घेणारा कारभार स्वच्छ आणि पारदर्शकरित्या राबविण्यासाठी आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्या वतीने विविध प्रभागांमध्ये विकास कार्यक्रमांची सातत्यपूर्ण मालिका राबविल्या जात आहे . नवनवीन वसाहतींमध्ये तसेच विकासकामांचे पूर्ततेपासून वर्षनुवर्षे प्रलंबित असलेल्या भागाला आमदार महोदयांच्या वतीने सर्वोतोपरी प्राधान्य दिले जण आहे . शहरी क्षेत्रात पायाभूत सुविधांची उपलब्धी करतांना जनसामान्यांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण करण्यासह नागरिकांना अपेक्षित विकास कार्यक्रम राबविण्याचे धोरण सुद्धा सौ . सुलभाताईंच्या वतीने अवलंबिल्या जात आहे . या शृंखले अंतर्गत मंगळवारी प्रभाग क्रमांक १ शेगाव -रहाटगाव अंतर्गत सात बंगला परिसर येथे रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामांचे आ. सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले . स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ६ लाख ६० हजाराच्या निधीमधून २६० मीटरची लांबी असलेल्या या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण होत असल्याने आता स्थानिकांना अवागमनाकरिता एक नवसुविधा उपलब्ध होत आहे . सर्व प्रथम विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करण्यासह आमदार महोदयांनी यावेळी कुदळ मारीत भूमिपूजनाचा औपचारिकता साधली . गत दहा वर्षांपासून स्थानीय नागरिकांची रस्तेसुविधा उपलब्धीची मागणी लक्षात घेता या कामाला आज प्रारंभ होत आहे . नागरिकांच्या निवेदनाचा स्वीकार करण्यासह त्यांच्या सूचनांचा आदर करीत शहरी क्षेत्रांमध्ये विकास कामांच्या गतिशील पूर्ततेकरिता आपण कटिबद्ध आहोत , या शब्दांमध्ये आ. सुलभाताई खोडके यांनी उपस्थितांशी संवाद साधला . कार्यक्रम प्रसंगी आमदार सुलभाताई खोडकेंसमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ए . झेड . काझी , शाखा अभियंता अनिल भटकर , प्रमोद महल्ले , यश खोडके , श्रीकांत डोंगरे , प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, सतीश राऊत, सुरेशराव वर्धे, दिनेश सुखदेवे, हरिभाऊ डोंगरे, दिलीप खेडकर, पवार, यादव, धुर्वे, चंद्रशेखर वानखडे, गुणवंत काळे, प्रेमचंद ठाकूर, पातुर्डे, आकाश भिसे, आनंद लोखंडे, आशिष घोंगडे, संजय कदम, विकास घाटे, दिघडे, पर्वतकार, बाबुलाल मोहोड, अनिल बनसोड, लांबटकर, उईके, ठाकरे, पवार, गवळी, वाडेकर, पांडुरंग गुल्हाने, सुरपाटणे, भोयर, प्रणय डांगे, सर्वतकर, आवनकर, पडोळे, अंकुश घुडे, सोळंके, रहाटे , किटुकले, काळंबेंडे, प्रमाण मुक्तेश्वर, इंगळे, आनंद बाडे, क्षीरसागर, जोगी आदींसहित सात बांगला परिसरातील सर्व जेष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक बांधव याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे श्रीकांत डोंगरे यांनी आभार मानले . या रस्ते सुविधा उपलब्धी बद्दल स्थानिकांच्या वतीने आ. सुलभाताई खोडके यांचे आभार मानीत अभिनंदन करण्यात आले .
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024