नवी दिल्ली : योग आणि निसर्गोपचार केंद्रीय संशोधन संस्था (सीसीआरवायएन) आयुष मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या निद्रा आणि योग या विषयावर नुकतेच दृक्र्शाव्य माध्यमाद्वारे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निद्रा या विषयातील तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला. यामध्ये मेंदूविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीयतज्ज्ञ, संशोधक आणि योग तसेच निसर्गोपचार चिकित्सक सहभागी झाले होते. या विज्ञानाधारित सत्रामध्ये तज्ज्ञांनी निद्रेविषयी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि योग निद्रेचे महत्त्व आणि लाभ विशद केले.
नवी दिल्लीच्या एम्सचे माजी प्राध्यापक डॉ. एच एन मल्लिक म्हणाले की, माणसाच्या झोपेचा संबंध हा जैविक लय, शरीर विज्ञान यांच्याशी निगडित असतो. आपल्या शरीराअंतर्गत एकूणच तालबद्धता साधण्याचे अतिशय महत्त्वाचे काम झोप करते. शरीर विज्ञानातल्या तालबद्धतेसाठी कारणीभूत ठरणार्या घटकांची आणि त्यांच्या परिणामांची माहिती डॉ. मल्लिक यांनी यावेळी दिली. खंडित झोपेमुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याची माहिती देताना ऋषिकेश येथील एम्सचे मानसोपचार आणि निद्रा वैद्यक विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. रवी गुप्ता म्हणाले, कोणत्याही अडथळ्याविना चांगली झोप झाली तर वजन नियंत्रित करणे आणि श्वासोच्छवास सुकरतेने घेणे शक्य होते. यासाठी प्राणायाम, योग, व्यायाम करण्याची आवश्यकता आहे, यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.
Related Stories
December 2, 2023