अमरावती : युवकदिनानिमित्त शहरात मंगळवारी विविध संस्थांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत रक्तदान केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय व राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात रक्तदान शिबिर झाले. त्यात 30 व्यक्तींनी रक्तदान केले. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, संदीप इंगोले, बाळकृष्ण महानकर, दीपक समदुरे, भास्कर घटाळे, वैशाली घोम, उमेश बडवे, परशुराम पवार, साहेबराव अलमाबादे, आकाश इंगोले, सचिन नवले, राजेश खेंगरे, कृणाल कांबळे, रवी वलिवकर, प्रफुल्ल गाभणे, गौरव भगोले, सौरभ मरसकोल्हे, प्रसाद भाग्यवंत, आकाश आरेकर आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवक दिवस व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राज्य राखीव पोलिस बल, लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी, स्व. लीलाबेन मंगलजीभाई पोपट फाऊंडेशन यांच्यातर्फे रक्तदान शिबिर अक्षदा मल्टिपर्पज हॉलमध्ये झाले. प्रारंभी राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक हरिष पोदार यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. रक्तदान शिबिरात रक्तगट तपासणी होऊन 86 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे अनिल अग्रवाल, अध्यक्ष स्व. लीलाबेन मंगलजीभाई पोपट फाऊंडेशनचे चंद्रकांत पोपट, अनिल मुनोत, लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे प्रा. प्रमोदकुमार, सहायक समादेशक पी. एम. शिंदे, नरेंद्र गुलदेवकर, सुरेश वासानी, डॉ. सुरूची देशपांडे, विजय उघडे, संदीप वरघट व अन्य उपस्थित होते.
स्वराज्य साप्ताहिक संपादक संघातर्फे दीपार्चन सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात 69 व्यक्तींनी रक्तदान केले. संघाचे संजय मापले, अनिल मिश्रा यांनी आयोजन केले.
Related Stories
December 2, 2023