मुंबई : टपाल विभागाच्या पेंशन / परिवार पेंशन घेणाऱ्या व्यक्तिंसाठी पोस्टमास्टर जनरल, मुंबई क्षेत्र, मुंबई यांच्या द्वारे सोमवार, दिनांक १५.०३.२०२१ रोजी ११.०० वाजता, पोस्टमास्टर जनरल, मुंबई क्षेत्र,यांचे कार्यालय,जीपीओ बिल्डिंग मुंबई- ४०० ००१ येथे पेंशन अदालत चे आयोजन करण्यात येत आहे.
पेंशन / परिवार पेंशन घेणाऱ्या व्यक्तिंनी आपले अर्ज खाली दिलेल्या प्रोफार्मा मध्ये वरिष्ठ लेखा अधिकारी, पोस्टमास्टर जनरल मुंबई क्षेत्र यांचे कार्यालय, जीपीओ बिल्डिंग, मुंबई- ४०० ००१ ह्या पत्त्यावर २०.०२.२०२१ पर्यंत मिळतील अशा रीतीने पाठवावेत. २०.०२.२०२१ ह्या तारखेनंतर मिळणाऱ्या अर्जाचा पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. कायदेशीर बाबी, धोरणात्मक निर्णय (पॉलिसी), बद्दलच्या तक्रारी पेंशन आदालत मध्ये विचारात घेतल्या जाणार नाहीत.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024