औरंगाबाद : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. काही दिवसांत जनगणना होणार आहे. या जनगणनेत ओबीसींसह जातीय जनगणना व्हावी. म्हणजे सगळ्यांची ताकद किती आहे हे कळेल. तसेच त्यांचे प्रश्न कळतील, सरकारलाही त्यावर उपापयोजना करायला सोपे जाईल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जालन्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यात यापुढचा मुख्यमंत्री ओबीसी असावा अशा घोषणा देण्यात आल्या. यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.
तुम्ही मुख्यमंत्री होणार का? असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, मला यापासून थोडे दूर ठेवा. कोणत्याही पदावर नसताना मला ही चळवळ लढायची आहे. माझ्यासाठी हे महत्वाचे ध्येय आहे. मुंडे साहेबांची एक अपूर्ण लढाई मी लढणार आहे. त्या औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवळी मांडली. प्रीतम मुंडे यांनीदेखील संसदेत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे, जनगणना होत असताना ती पाऊलं सकारात्मक पडली पाहिजेत. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यात प्रत्येत गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. त्या समुदायाला न्याय देण्यासाठी मदत होईल, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
आता मी राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्याने माझ्या अनेक भूमिका, मुद्दे राष्ट्रीय स्तरावर नोंदवण्याची आवश्यकता असते. त्याच्यामुळे मी हिंदी भाषा वापरते, काल पहिल्यांदा वापरली नाही. जेव्हापासून मी राष्ट्रीय सचिव झाले तेव्हापासून बर्याच शुभेच्छा आणि मतं हिंदीत व्यक्त करत असते, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले.
धनंजय मुंडेंवरील आरोपांवर सोडले मौन
तो विषय बर्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचे सर्मथन मी करू शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे. एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचे राजकीय भांडवलं केले नसते, आजही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
Related Stories
September 5, 2024
September 5, 2024
September 4, 2024