मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये माजी सैनिकांसाठी राखीव आसने असावीत, अशी मागणी जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. बहुजन हिताय – बहुजन सुखाय हे ब्रीद सार्थकी ठरवित एसटी आज राज्याची खरी लोकवाहिनी ठरली आहे. रस्ता तिथे एसटी असे समीकरण झाले आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर धावत असलेल्या महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून विविध घटकांना सवलत दिली जाते. स्वातंत्र्यसंग्रामसैनिक, महिला आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकार बांधवांसाठी आसने राखीव असतात. त्याचप्रमाणे, देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना देखील एसटीमध्ये राखीव आसनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी श्री. कडू यांनी केली आहे.
Related Stories
December 2, 2023