अमरावती : महाडीबीटी प्रणालीवरील अर्ज महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत. विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती व मार्गदर्शन करावे, असे आवाहन सहायक समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांनी केले आहे.
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित, नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व कागदपत्रे जोडून अर्ज समाजकल्याण विभागाच्या लॉगिनवर सादर करणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण किंवा कागदपत्रे कमी असल्यास अर्ज विद्यार्थी लॉगिनवर पूर्ततेसाठी परत करावेत किंवा विद्यार्थ्यांची कागदपत्रे प्राचार्य यांच्या लॉगिनमधून अपलोड करून रिमार्कमध्ये सर्व कागदपत्रांचा स्पष्ट उल्लेख करावा. केवळ ऑल ओके असे नमूद करू नये. नूतनीकरण विद्यार्थ्यांची यादी समाजकल्याण कार्यालयाला सादर करावी. नूतनीकरणाचा अर्ज भरताना प्रथम वर्षाचा अर्ज ज्या योजनेत मंजूर झाला, त्यातच अर्ज भरावा. स्कीम बदलू नये.
नवीन अर्जासाठी 10 वी ते मागील वर्षीची गुणपत्रिका, ओरिजिनल टीसी किंवा प्राचार्यांनी साक्षांकित केलेली टीसी, गॅप सर्टिफिकेट, प्रवेश पावती, कॅप कन्फर्मेशन लेटर, 2019-20 चे तहसीलदारांचे आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, मागील वर्षी शिष्यवृत्ती मिळाली किंवा नाही त्याचा आदेश क्रमांक, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गासाठी अपत्य प्रमाणपत्र (याचा नमुना पोर्टलला आहे), विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, पतीचे उत्पन्न प्रमाणपत्र, पालक हयात नसल्यास डेथ सर्टिफिकेट, मातापिता हयात नसल्यास पालकाचे प्रमाणपत्र, गार्डियनचे उत्पन्न प्रमाणपत्र.
नूतनीकरणासाठी अर्जासाठी 10 वी ते मागील वर्षीची गुणपत्रिका, ओरिजिनल टीसी किंवा प्राचार्यांनी साक्षांकित केलेली टीसी, गॅप सर्टिफिकेट, इन कोर्स गॅप असल्यास ओरिजिनल गॅप सर्टिफिकेट, प्रवेश पावती, कॅप कन्फर्मेशन लेटर, आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, त्याच महाविद्यालयात मागील वर्षी शिष्यवृत्ती मिळाली किंवा नाही त्याचा आदेश क्रमांक, विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, पतीचे उत्पन्न प्रमाणपत्र, पालक हयात नसल्यास डेथ सर्टिफिकेट, मातापिता हयात नसल्यास पालकाचे प्रमाणपत्र, गार्डियनचे उत्पन्न प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024