शेंदुर्जना बाजार/नरेश इंगळे
तिवसा तालुक्यातील काही गावामध्ये निश्चित केलेल्या भारनियमनाने अडचणी निर्माण होत असून हे भारनियमन कमी करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
तिवसा तालुक्यातील भांबोरा, अमदाबाद कर्माबाद शिवारासह अन्य भागांमध्ये विजवितरण कंपनीने सध्या भारनियमन सुरू केलेले आहे.विजवितरण कंपनीच्या वेळापत्रका नुसार आठवड्यातून तीन दिवस रात्रीचे आणि तीन दिवस दिवसाच्या वेळेत भारनियमन असते. भारनियमनमाने ग्रामीण भागातील सर्वसामान्यसह शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत.विशेष म्हणजे या परिसरात सिंचन क्षेत्र अधिक असल्याने ओलित करण्यासाठी विजेची नितांत गरज आहे.संत्रा व पालेभाज्या उत्पादक शेतकरी यांना ओलित करणे अनिवार्य आहे.विजेचा पुरवठाच नसल्याने ओलित कसे करावे हा प्रश्न आहे.
शेतमाल सुरक्षितता आणि वन्य प्राण्यांपासून होणारा त्रास थांबविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये विजेचे दिवे बसविले आहे तर काही शेतकऱ्यांनी मजुरांची निवसाची व्यवस्था शेताच केली आहे.असे शेतमजूर आपल्या लहान मुलांसह शेतावर कुडाकाडीच्या घरात वास्तव्यास असलेल्या कुटूंबासमोर अधिक अडचणी निर्माण होत आहे.निदान रात्रीच्या भारनियमनाच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा सुरू ठेवावा अशी रास्त अपेक्षा या मजुरांनी व्यक्त केलेली आहे.
शेतकरी व शेतावरील निवासी मजुरांची अडचण लक्षात घेता हे भारनियमन कमी करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी कडून होत आहे.
——————
सिंगल फेज वीजपुरवठा पूर्ववत ठेवावा-भालचंद्र पोलाड
काही शेतामध्ये आपल्या लहान मुलाबाळांसह काही शेतमजुर निवासी आहे. रात्रीचे भारनियमन असल्याने त्यांना लहान मुलासह अंधारातच रात्र काढावी लागते. त्यामुळे वन्य श्वापदे व जनावरापासून शारीरिक नुकसानाची शक्यता नाकारता येत नाही.त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निदान रात्रीच्या वेळी तरी सिंगल फेज वीजपुरवठा पूर्ववत ठेवण्याची अपेक्षा.भांबोरा येथील शेतकरी भालचंद्र पोलाड यांनी व्यक्त केली आहे
फोटो–
१)रात्रीच्या वेळी शेतात वास्तव्यास असलेले कुटुंब
२)भालचंद्र पोलाड