नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने पूर्णतः डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस) सुरु केली आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना समाधान मिळवून देण्यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस) हा भारतीय रेल्वेचा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. रेल्वे प्रणालीची कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी आणि पंतप्रधानांचा भारताला डिजिटल सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत परिवर्तित करण्याचा दृष्टीकोन साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. एचआरएमएसचा सर्व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊन ते तंत्रज्ञानाविषयी अधिक सजग होतील अशी अपेक्षा आहे.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त एचआरएमएस व युजर डेपोचे खालील मॉड्यूल सुरू केले आहेत.
कर्मचारी स्वयं सेवा (ईएसएस) मॉड्यूल, रेल्वे कर्मचाऱ्यांना डेटा बदलण्याच्या संदर्भात संवादासह एचआरएमएसच्या विविध विभागांशी संवाद साधण्यास सहाय्य करेल.
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अॅडव्हान्स मॉड्यूल रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांचा शिल्लक पीएफ तपासण्यासाठी आणि आगाऊ पीएफ (अॅडव्हान्ससाठी) ऑनलाईन अर्ज करण्यास सहाय्य करेल.
सेटलमेंट मॉड्यूल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण सेटलमेंट प्रक्रियेचे डिजिटायझेशन करते. कर्मचारी त्यांची सेटलमेंट / निवृत्ती वेतन पुस्तिका ऑनलाईन भरू शकतात. सेवेचा तपशील ऑनलाईन तपासला जातो आणि निवृत्ती वेतनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यामुळे कागदाचा वापर कमी होतो आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची थकबाकी वेळेवर मिळण्यास मदत होते.
या मॉड्यूल्सपूर्वी भारतीय रेल्वेने एचआरएमएसचे इतर अनेक मॉड्यूल सुरु केले आहेत रेल्वे कर्मचाऱ्यांचे सर्व मूलभूत माहितीच्या तपशीलाची नोंद ठेवणारा कर्मचारी मास्टर मॉड्यूल, कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या नोंदी डिजिटल स्वरुपात संग्रहित करणारे इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस रेकॉर्ड मॉड्यूल, वार्षिक कामगिरी मूल्यमापन अहवाल (एपीएआर) मॉड्यूल, इलेक्ट्रॉनिक पास मॉड्यूल, ऑफिस ऑर्डर मॉड्यूल यांचा समावेश आहे.
Contents
hide
Related Stories
November 7, 2024
November 4, 2024
November 2, 2024