नवी दिल्ली : भारताची कोविड लस म्हणजे मानवजातीचा फायदा करून देणारी देशाच्या विज्ञानाची ही उत्तुंग भरारी आहे अशा शब्दात भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी काल दोन कोविड लसीं तात्काळ अधिकृत केल्यावर कौतुक केले. आत्मनिर्भर भारत अभियान केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला कसा फायदा देऊ शकतो याचे हे संकेत आहेत यावर समाजमाध्यमांवर लिहिताना नायडू यांनी भर दिला. कोविड -१९ चा प्रतिबंध करताना गत वर्षी देशाने दर्शविलेल्या राष्ट्रीय संकल्पांचे स्वागत करताना याच भावनेने या वर्षात लोकांपयर्ंत लस पोहचविण्याचे आवाहन नायडू यांनी केले.
मुबलक प्रमाणात लस तयार करण्याबरोबरच आपल्या वातावरणाला अनुकूल लस देण्याची क्षमता दर्शवून प्राणघातक रोगापासून मानवतेचे रक्षण करण्याच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे.
भारतातील स्वदेशी लसीची (कोवॅक्सिन) संपूर्ण विषाणूच्या दृष्टिकोनावर आधारित काही खास वैशिष्ट्ये आहेत. ही कौतुकास्पद कामगिरी असून सर्व संबंधित धैयार्ने व उत्साहाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळावे यासाठी पात्र आहेतह्व असे नायडू यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की लसी उपलब्ध करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे जगभरातील लोकांना आशा वाटते की स्पॅनिश फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यापासून गेल्या शंभर वर्षातील अत्यंत भीषण आरोग्याच्या आव्हानाविरोधातील सामूहिक लढ्यात भारत नेतृत्व करेल.
कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना मान्यता देण्यापूर्वी उपराष्ट्रपतींनी देशाला नियामकांच्या आश्वासनाचा संदर्भ दिला. लसीच्या घोषणेसह भारताची विज्ञानामधील उत्तुंग भरारी ही आत्मनिर्भर भारताच्या भावनेची स्पष्ट अभिव्यक्ती आहे. हे सर्वांना सामायिक करून त्यांची काळजी घेण्याच्या आपल्या नीतिमूल्येला न्याय देते, असे नायडू म्हणाले. या वर्षात लोकांपयर्ंत लसी पोहचविण्याबाबत पूवीर्चाच संकल्प करण्याची गरज व्यक्त केली.
Contents
hide
Related Stories
November 7, 2024
November 4, 2024
November 2, 2024