अमरावती : महाराष्ट्र शासनाने सन २0२१ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत नुकतेच शासन परिपत्रक काढले असून या परिपत्रकात डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे यावर्षीपासून मंत्रालयात आणि सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात भाऊसाहेबांची जयंती साजरी होणार आहे.स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख यांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने केलेल्या कायार्साठी त्यांना भारत सरकारने कृषिर% उपाधीने सन्मानित केले असताना शासकीयस्तरावर त्यांची जयंती साजरी होत नव्हती. त्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने मा.मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून भाऊसाहेबांची जयंती शासकीयस्तरावर साजरी करण्याची विनंती करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी स्वत: यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला.आमदार देवेंद्र भुयार यांचेही यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आणि शासकीय परिपत्रकात भाऊसाहेबांच्या जयंतीचा समावेश करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन २0२१ मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत कालच एक परिपत्रक निर्गमित केले असून या परिपत्रकामध्ये सोमवार दि.२७ डिसेंबर २0२१ भाऊसाहेबांची जयंती मंत्रालयात आणि सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024