भंडारा : नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्याकडून घडलेल्या घटनेसंदर्भात विस्तृत माहिती घेतली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, माजी खासदार मधुकर कुकडे आदी उपस्थित होते.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीमुळे दहा बालकांचा मृत्यु झाला तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त आयसीयु कक्षाला तसेच वाचलेल्या बालकांच्या कक्षाला भेट दिली.
या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाने विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून या समितीचा अहवाल तातडीने प्राप्त होणार आहे, असे ना. शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. घटना अत्यंत दुर्दैवी असून यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
Related Stories
November 2, 2024
October 24, 2024