नागपूर : १५ फेब्रुवारीपासून वाहनांना फास्टॅग लावणे गरजेचे आहे. ही शेवटची तारीख असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे. नागरिकांना फास्ट टॅग लावण्यासाठी अडचण जाऊ नये यासाठी टोल नाक्याच्या बाजूलाच फास्टॅगच्या विक्रीची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर वाहनांना फास्टॅग लावून घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २0२१ पासून फास्टॅग अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले असून यामध्ये १ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला. विशेष म्हणजे हा नियम १ डिसेंबर २0१७ च्या अगोदर खरेदी झालेल्या वाहनांससह एम आणि एन कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.
Related Stories
December 7, 2023