औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर सहकारी कारखाना सुरु करावा, गोठवण्यात आलेले शेतकऱ्यांचे बँक खाते सुरु करावे, थकीत सुमारे 11 कोटी रुपये परत मिळावे, आमदार प्रशांत बंब यांच्यासह इतरांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी मनसेचे संतोष जाधव यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत क्रांती चौक ते प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावर मोर्चा, ठिय्या व निदर्शने आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलक शेतकरी संतप्त झाले व कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनाचा मोर्चा क्रांती चौकातील मुख्य रस्त्यावर जाऊन रस्ता रोकोत रुपांतर झाले. यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली होती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करून हटवण्यास सुरुवात केली. यात आंदोलक व पोलिस यांच्या धरपकड झाली आणि पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. यात प्रमुख नेत्यांनाही पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. दरम्यान, पोलिसांनी अनेकांना अटक करुन आंदोलन मोडून काढले.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024