अमरावती : टपाल विभागाच्या अमरावती प्रवर अधीक्षक कार्यालयातर्फे डाक अदालत 22 डिसेंबरला दुपारी चार वाजता होणार आहे.
विभागातील टपाल विभागाच्या कामासंबंधी जसे की, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, पार्सल सेवा, बचत बँक याबाबत ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल, त्यावर अदालतीत निर्णय होईल. संबंधितांना 14 डिसेंबरपूर्वी तक्रारी प्रवर अधीक्षक कार्यालयाला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Related Stories
December 2, 2023