उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या या ऋतूबदलाच्या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रादूर्भाव वाढतो. दुपारी कडक ऊन आणि रात्री गारवा अशा वातावरणामुळे प्रतिकारशक्ती कमी असणारे लोक आजारांना बळी पडतात. मात्र आहाराचं पथ्य पाळून आपण या समस्येवर मात करु शकतो. याविषयी..
* मुलांच्या आहारात व्हटॅमीन सी चा समावेश केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. * दूध किंवा दुधजन्य पदार्थ मुलांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मुलं दूध प्यायला कुरकुरत असल्यास मिल्क शेक किंवा स्मुदीमधूनही दूध देऊ शकता. * मासे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहेत. माशांचं सेवन केल्यास शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळून रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते. मासे करी कंवा सूपच्या स्वरूपात द्यावेत. * कोणत्याही ऋतूत सुका मेवा खाणं आरोग्यदायी असतं. पण या काळात मोठय़ा प्रमाणावर त्याचे फायदे मिळतात. त्यामुळे या दिवसात मुलांना अक्रोड, बदाम, बेदाणे आवर्जून द्यावेत. यामुळे मुलांना पर्याप्त मात्रेत उर्जा मिळत राहील. * मशरुमध्ये व्हटॅमीन डी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्याचं सेवन वाढवावं.