(कोकण मराठी परिषद गोवा तर्फे आयोजित सोळाव्या शेकोटी साहित्य संमेलनात प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या यथा प्रजा तथा राजा या बालकथासंग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर. बाजूस प्रा. नारायण महाले, सागर जावडेकर, एड. रमाकांत खलप, लेखक प्रकाश क्षीरसागर, डॉ. विनोद गायकवाड, आनंद देसाई व सौ. चित्रा क्षीरसागर.. )
पणजी : गोमंतकीय पत्रकार व साहित्यिक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या यथा प्रजा तथा राजा या बालकथासंग्रहाचे प्रकाशन केरी फोंडा- गोवा येथे अलीकडेच झालेल्या सोळाव्या शेकोटी साहित्य संमेलनात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व अनुवादक रवींद्र गुर्जर आणि डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते. रवींद्र गुर्जर यांच्या हस्ते या बालकथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सूत्रसंचालक प्रा. गोविंद भगत, माजी केंद्रीय कायदा मंत्री एड. रमाकांत खलप, समीक्षक व कथाकार प्रा. नारायण महाले, संस्थेचे अध्यक्ष सागर जावडेकर, सचिव चित्रा क्षीरसागर आदी उपस्थित होते.
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. सद्गुरू सीताराम महाराज चरित्रामृत हा ओवीबद्ध ग्रंथ, गर्भावल्या संध्याकाळी, मातीचे डोहाळे (माती पाऊस आणि सखी), जमाना बदलल्याचं चिन्ह हे कवितासंग्रह, झेलून दुःख माझे गेला खचून रस्ता हा गझलसंग्रह, तसेच माणसांची खैर नाही हा ललितलेखसंग्रह तसेच आजि म्या कृषक पाहिला हा कथासंग्रह आदी पुस्तके प्रकाशित आहेत. माणसांची खैर नाही हा ललितलेखसंग्रह धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठात बी. कॉम परीक्षेत अभ्यासक्रमासाठी लागलेला आहे.