मुंबई : इंधन दरवाढीचा आलेख चढताच असून बुधवारी पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात २९ ते ३0 पैसे आणि डिझेलच्या दरात २५ ते २७ पैशांची वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
इंडियन आईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ८७.६0 रुपये आणि डिझेलचा दर ७७. ७३ पैशांवर पोहोचला आहे. तर मुंबईतील पेट्रोलचा दर ९४.१२ आणि डिझेल ८४.६३ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८८.९२ आणि डिझेल ८१.३१ रुपये, चेन्नईत पेट्रोल ८९.९६ आणि डिझेलचा दर ८२.९0 रुपये आहे.
Related Stories
December 7, 2023