मुंबई: आहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित पुण्योक अहिल्याबाई ही मालिका आजपासून सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. या मालिकेमध्ये अदिती जलतरे ही मराठमोळी बालकलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अदिती या मालिकेत अहिल्याबाईंच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका मिळवण्यासाठी अदितीला तब्बल १000 मुलींशी स्पर्धा करावी लागली होती. या भूमिकेसाठी १ हजार मुलींनी ऑडिशन दिली होती. त्यामध्ये अदितीने बाजी मारली आहे.
अदितीने या आधीच बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली आहे. सिंधू या मालिकेत अदितीने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. तसेच मेरे साई या मालिकेतही तिने छोटीशी भूमिका केली होती. अवघ्या १0 वर्षाच्या अदितीसाठी अहिल्याबाईंची भूमिका मिळवणे सोप्पे काम नव्हते. ऑडिशनची सगळी प्रोसेस तब्बल ८ महिने सुरू होती.
पुण्योक अहिल्यादेवी या मालिकेचे दिग्दर्शक जॅक्सन सेठी म्हणातात, अहिल्यादेवींची भूमिका साकारणे अतिशय आव्हानात्मक आहे. त्यासाठी आम्ही एका निरागस मुलीच्या शोधात होतो. मला असे वाटते की, अदितीने लहानपणीच्या आईल्याबाईंची भूमिका सक्षमपणे साकारली आहे.
पुण्योक अहिल्यादेवी ही मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेत अदितीसोबतच, राजेश श्रृंगारपुरे, स्नेहलता वसईकर, क्रिश चौहान, सुखदा खांडकेकर, भाग्यश्री, आर्यन प्रीत हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
Related Stories
November 28, 2023
November 27, 2023
November 27, 2023