नवी दिल्ली : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पाचव्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आणि नागरिकांना विशेष आवाहन केले. ट्वीटरद्वारे आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कष्टकरी शेतक-यास नैसर्गिक संकटापासून संरक्षण देण्यासाठी महत्त्वपूर्ण पंतप्रधान पीक विमा योजनेला पाच वर्षे झाली आहेत.
या योजनेमुळे विम्याची व्याप्ती वाढवली गेली, जोखीम कमी झाली आणि त्यामुळे कोट्यवधी शेतकर्यांना लाभ मिळाला. या योजनेच्या सर्व लाभार्थींचे अभिनंदन. पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकर्यांना अधिक लाभ कशाप्रकारे सुनिश्चित झाला. दावे निकाली काढण्यात पारदर्शकता कशी राखण्यात आली यासारख्या पंतप्रधान पीक विमा योजनेशी संलग्न माहिती नमो अप्लिकेशनवर युवर व्हॉईस या विभागात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Related Stories
December 7, 2023