अमरावती : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर या रविवारी (24 जानेवारी) अमरावती जिल्हा दौ-यावर आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : शनिवारी (23 जानेवारी) रोजी बुलडाणा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनंतर रात्री 10 वाजता पालकमंत्र्यांचे अमरावती निवासस्थानी आगमन होईल. दिनांक 24 जानेवारीला सकाळी 9.30 वाजता अमरावती निवासस्थान येथून वाहनाने दर्यापूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता शेंडगाव ता. दर्यापूर येथे आगमन व विकास कामांचे भूमीपूजन, दुपारी 12 वा. कोकर्डा येथील पूलाचे भूमीपुजन, दुपारी 12.30 वाजता दर्यापूर-अकोट रस्त्यावर अंजनगाव सुर्जी टी-पॉईन्टवर आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित ई.पी.सी. 7 अंतर्गत रस्त्याचे भूमीपुजन, दुपारी 1.30 वाजता दर्यापूर-आमला रस्त्यावर तहसील कार्यालय, दर्यापूर समोरील आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित ई.पी.सी. 7 अंतर्गत रस्त्याचे भूमीपुजन, दुपारी 2 वाजता दर्यापूर येथून अमरावतीकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन व अभ्यागतांना भेटी, सायंकाळी 5 वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.
Related Stories
October 9, 2024