नवी दिल्ली : जर एखादे जोडपे पती पत्नी म्हणून एकमेकांसोबत राहात असेल तर पती कितीही क्रूर असला तरी त्या दोघांमधील शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येईल का?, असा प्रश्न सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि न्या. वी. राजसुब्रमण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असणार्या व्यक्तीला दिला देणारा निकाल दिला आहे. आठ आठवड्यांसाठी या व्यक्तीला अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.
हा निकाल देताना न्यायालयाने वैवाहिक बलात्कार (मॅरिटल रेप) म्हणजेच विवाह झाल्यानंतर बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्याच्या तक्रारींसंदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. एकमेकांसोबत पती-पत्नी म्हणून राहणार्या जोडप्यामधील शरीरसंबंधांना बलात्कार म्हणता येईल का असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला आहे.
उच्च न्यायालयाने आरोपीच्या विरोधात उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्धनगर जिलमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुनची नोंद रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली होती. वेगवेगळ्या प्रकरणांसर्भात निकाल देताना खंडपीठाने हे निरिक्षण नोंदवले आहे. या याचिकांपैकी एका याचिका आरोपीचीही आहे. या आरोपीने एप्रिल २0१९ मध्ये अलाहाबाद हायकोटार्ने दिलेल्या निकालाला आव्हान दिले आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदार महिलेची बाजू मांडणार्या वकीलाने आरोपीने महिलेची फसवणूक करुन तिची सहमती मिळवल्याचा दावा केला. आरोपी २0१४ साली महिलेला हिमाचल प्रदेशमधील मनाली येथील एका मंदिरामध्ये घेऊन गेला आणि त्यांनी तिथे लग्नाच्या विधी केल्याची माहिती वकीलाने दिली.
याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील विभा दत्त मखीजा यांनी आरोपी आणि महिला दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर या महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. लग्नाचे खोटे आश्वासन देणे चुकीचे आहे. कोणत्याही महिलेनेही अशाप्रकारचे आश्वासन देऊन नंतर शब्द फिरवता कामा नये, असे मत खंडपीठाने नोंदवले.
ही तक्रार दाखल करणार्या महिलेची बाजू मांडणार्या वकीलांनी आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तीने केवळ या महिलेचा पती असल्याचे नाटक केले. मात्र नंतर त्याने दुसर्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप केला.