नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २३ जानेवारी २0२१ रोजी कोलकात्याला जाणार असून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीवर्षानिमित्त होणार्या पराक्रम दिवसाच्या विशेष कार्यक्रमात ते आपले विचार मांडतील. तसेच, पंतप्रधान त्यानंतर, आसाममधील जीरांगा पठार या ठिकाणीही भेट देणार असून तिथे एक लाख सहा हजार भूमी पट्ट्यांचे वाटप लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते केले जाईल.
कोलकाता इथल्या व्हिक्टोरिया मेमोरियल येथे होणार्या पराक्रम दिवसाच्या उद््घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अदम्य साहसी कार्य आणि देशासाठी केलेल्या नि:स्वार्थ सेवेचा सन्मान करण्यासाठी, त्यांची २३ जानेवारीला असलेली जयंती दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दिवसापासून लोकांना विशेषत: युवकांना प्रेरणा मिळून तेही, नेताजींसारखीच अडचणींवर, संकटातून मार्ग काढण्याची प्रेरणा या युवकांना मिळावी आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जाणार आहे.
यावेळी नेताजींच्या जीवनकायार्चा परिचय देणार्या कायमस्वरूपी प्रदर्शन आणि दृक र्शाव्य शोचे उद््घाटनही त्यांच्या हस्ते होईल. तसेच नेताजींच्या स्मरणार्थ पंतप्रधान एक विशेष नाणे आणि टपाल तिकीटाचेही अनावरण करतील. नेताजींच्या आयुष्यावर आधारित आम्रा नुतोन जौबोनेरी दूत हा सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी सादर केला जाईल. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयाला देखील भेट देतील. याठिकाणी, ह्लएकविसाव्या शतकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वारशाला पुनर्भेटह्व या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. त्याशिवाय, कलाकारांचे एक शिबीरही तिथे होणार आहे. पंतप्रधान यावेळी कार्यक्रमातील मान्यवर आणि कलाकारांशी संवाद साधतील.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024