/नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांशी संवाद साधतील. यावेळी ते कृषी कायद्यातील वैशिष्ठय़े समजावून सांगतील. त्यानंतर उत्तर प्रदेशतील भाजपा कार्यकर्ते हे कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र घरोघरी पोहचवतील. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी अयोध्येत शेतकर्यांसोबत जोडले जाण्याचा भव्य कार्यक्रम होणार आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच ते कृषी कायद्यांचे महत्त्व शेतकर्यांना सांगणार आहेत.अयोध्येत एकूण ३७७ ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे अडीच हजार ठिकाणी शेतकर्यांना जोडले जाण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यक्रम होणार आहे.
Contents
hide