अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाढी वाढविली म्हणून त्यांनी स्वतःला रवींद्रनाथ टागोर समजू नये अशी टीका महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली असून प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याइतपत यशोमती ठाकूर यांची लायकी नाही.असा पलटवार ठाकूर यांच्या वक्तव्यावर भाजपाच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला आहे.कृषी कायद्याच्या विरोधात दोन कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे काँग्रेस भासवत असून काँग्रेसचे कुणीही शेतकऱ्यांच्या दारात गेले नसतांना या स्वाक्षऱ्या कुणी केल्या हा प्रश्नच आहे. कोठे सत्ता भोगण्यासाठी विचारधारेले मुठमाती देऊन एकत्र आलेली यशोमती ठाकूर यांच्या सारखी पंचमहाभूते तर कोठे प्रचंड बहुमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार याचे किमान भान यशोमती ठाकूर यांनी जीभ टाळूला लावण्यागोदर बाळगावे नाही तर त्यांची अवस्था सुद्धा पप्पू सारखी होईल.जेथे काँग्रेसचे मोठे नेते मोदींवर टीका करतांना दहावेळा विचार करतात तेथे तिवसा मतदारसंघातुन निसटता विजय मिळालेल्या यशोमती ठाकूर यांची लायकी मोदींवर टिका टिप्पणी करण्याऐवढी निश्चितच नाही.ठाकूर यांचे विधान आगामी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर डोळा ठेवून केलेले आहे अशी टीका सुद्धा निवेदिता चौधरी यांनी केली आहे. पेड प्रसिद्धी कमी पडल्याचे जाणवताच असे विधाने करून मी काय ड्याशिंग आहे हे दाखविणे व प्रसिध्दी मिळविणे अशी ठाकूर यांची जुनीच खोड आहे.
Contents
hide
Related Stories
November 27, 2024