अमरावती : मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरपिंगळाई गावातील संरपंचपदाची निवड १२ फेब्रुवारी रोजी झाली. १७ सदस्य असलेल्या ग्राम पंचायत मध्ये ७ सदस्य ग्रामविकास आघाडी ३ सदस्य, शेतमजूर युनियन ४ अपक्ष व २ सदस्य भाकप पक्षाचे आहेत. कॉंग्रेसव भाजप नेत्यांनी
प्रयत्नांची पराकाष्टा करूत सरपंचपदी कॉंग्रेसच्या सविता खोडस्कर तर उपसरपंचपदी अपक्ष मंगेश अडणे यांची निवड करण्यात आली.नेरपिंगळाई ग्राम पंचायत पदाकरीता कॉंग्रेस तर्फे सविता खोडस्कर तरे शेतमजुर युनियन तर्फे शायना परविन व उपसरपंचपदाकरीता कॉंग्रेसकडून मंगेश अडणे तर शेतमजुर युनियन कडून राजु इंगळे यांनी निवडणुक अर्ज भरला होता.कॉंग्रेसच्या उमेदवाराला १0 मते तर शेतमजुर युनियनचे उमेदवाराला ७ मते पडली असून सरपंच व उपसरपंचपदाची माळ कॉग्रेसउमेदवाराच्या गळयात पडली असून त्यांनी आपला पदभार स्विकारला आहे. ५0 वर्षाच्या इतिहासात पहिल्यादा कॉंग्रेसचा सरपंच झाला हे विशेष. सरपंच निवडीकरीता कॉग्रेस व भाजपा च्या कार्यकर्त्यानी अथक पर्शिम केले . त्यामध्ये गजानन तायवाडे, संजय मोहोकर, अमोल तिरमारे, विजय गाडगे, निलेश बेहरे, सागर मोहोड, अतुंल खोडस्कर,डॉ.प्रकाश कनेर, सूरज अवचार आदीनी पर्शिम घेतले.निवडणुक अधिकारी म्हणून आर.बी. माहिंदे,उके, पाटील, राठोड यांनी काम पाहिले.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023