- पिंपळखुटा/स्वाती इंगळे
येथील श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागच्या वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष मुरे होते. सर्वप्रथम नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. तदनंतर ऑनलाइन झूम मीटिंग द्वारे नेताजी सुभाष चंद्र बोस त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अनुषंगाने प्राचार्य डॉ सुभाष मुरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेश इंगळे यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच डॉ.मेघा सावरकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला अमित मेश्राम तसेच सायली ढाणके,पूजा वानखडे, मोहिनी इंगोले नीता मांढरे वैष्णवी इंगोले सह ऑनलाइन कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.