प्रतिनिधी : आय आर बी कंपनीचा नांदगाव पेठ येथील टोल मोर्शी, वरुड रस्त्याचा वापर करणाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता न वापरता द्यावा लागत असल्याने या टोल विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून टोल मुक्ती समिती वेगवेगळ्या मार्गाने प्रयंत्न करीत आहे . अनेकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलीत. आमदार सौ. सुलभा खोडके, देवेंद्र भुयार यांनी गडकरी यांच्याशी संपर्क करून या टोल हटविण्यासाठी त्यांना विनंती केली. पण गडकरी यांनी प्रत्येकाला फक्त आश्वासन दिलीत. व अजूनही आय आर बी चा हा टोल मोर्शी वरुड रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्व शेतकरी, नागरिकांची आर्थिक लूट करीत आहे. त्यामुळे या अवैध टोल विरोधात आता अंतिम आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका टोल समितीने घेतली आहे. समितीच्या या आवाहनाला अनेक तरुणांनी प्रतिसाद देऊन या टोल विरोधातील आंदोलनासाठी आंदोलक म्हणून स्वतःहून पुढे येऊन आपले नाव दिलेले आहे. आंदोलन तीव्र होण्यासाठी व या आंदोलनात जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी व लोकांचा सहभाग राहण्यासाटी अमरावती, मोर्शी, वरुड या तालुक्यातील आंदोलकांची मीटिंग चे आयोजन समितीने सोमवारी २८ डिसेंबर ला दुपारी १ वाजता. दुर्गादेवी मंदिर हॉल, दुर्गा नगर, मोर्शी येथे केले आहे . तरी या बैठकीला जास्तीत जास्त आंदोलकांनी उपस्थित राहावे असे आवाहन टोल हटाव समिती कडून केलेले आहे.
Related Stories
December 7, 2023