नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीपैकी चार ग्रामपंचायती अविरोध झाल्या त्यामुळे ४७ ग्रामपंचायती करीता प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर १८ जानेवारी रोजी निकाल घोषीत झाले. प्रत्येक गावात प्रस्थापितांना हादरे बसले तर काही ग्रामपंचायतीमध्ये सत्ता बदल झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अनेक ग्रामपचायतीमध्ये स्थानिकांनी नविन चेहर्यांना संधी दिली आहे. उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे गावात सर्वत्र जल्लोषाचे वातवरण पहावयास मिळत आहे. येणस या गावात सत्ता परिवर्तनासाठी इश्वर चिठठीने साथ दिली. एकंदर रित्या तालुक्यातील ग्रामपंचायत वर महाविकास आघाडीचे वर्चस्व पहावयास मिळाले.
Related Stories
September 30, 2024